सामाजिक भान जपणारे पत्रकार अजीत माळी यांच्या वाढदिवसानिमित्त पाणी दान..

0
सामाजिक भान जपणारे पत्रकार अजीत माळी यांच्या वाढदिवसानिमित्त पाणी दान..


उस्मानाबाद :- पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ..आणि हा स्तंभच महत्त्वाचा असतो देशातील बरे वाईटच्या वार्ता प्रसारित करुन जनहित देशहित घडविण्यासाठी..शासकिय रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीचा शुद्ध पाणी सेवेच्या उपक्रमात पत्रकार अजीत माळी यांनी सामाजिक भान जोपासत सध्याच्या कोरोना जैविक विषाणुच्या महासंकटातील परिस्थितीत स्वताच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले व शुद्ध पाण्याचे दान करुन रुग्ण सेवेत सहभागी झाले.माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ राजभाऊ गलांडे यांनी अजीत माळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव,पाणी दान याविषयी मनोगत व्यक्त केले,इतरही मान्यवरांनी अजीत माळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,या पाणी दान कार्यक्रमात तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक मा.राजभाऊ गलांडे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सचीन देशमुख,डॉ.गोसावी, डॉ.गणेश पाटील, परिचारिका संध्या निकम,शेख ब्रदर,सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान नाईकवाडी,उमेश राजे निंबाळकर,रुग्ण कल्याण समिती सदस्य अ लतिफ अ मजीद,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,सचीन चौधरी, मृत्युंजय बनसोडे, रमेश गंगावणे अन्य इतर उपस्थित होते.पाणी दान केल्याबद्दल रुग्ण कल्याण समिती सदस्य अ लतिफ अ मजीद यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top