ऑक्सिजन तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

0

प्रतिनिधी.
तामलवाडी येथे असणारा गोरज गॅस हा प्लांट  उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णासाठी वरदान ठरला आहे. एकीकडे दिवसेंदिवस कोरोणा हा विषाणू धुमाकूळ घालत असुन उस्मानाबाद जिल्ह्यात  मोट्या संखेने रुग्ण वाढत आहेत. राज्यभरात ऑक्सिजन टंचाई निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर तामलवाडी येथे असणारा गोरज गॅस निर्मिती प्लांट रात्र दिवस कर्मचारी काम करत असून गॅस निर्मिती करत आहेत.या ऑक्सिजन मुळे  कोविड संक्रमित रुग्ण मरण पावणारी  संख्या कमी होण्यास मदत झाली. याचे नियंत्रण प्रशासनाच्या निंत्रणाखालील होते तुळजापुरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या मार्गदरशनाखाली पोलिस प्रशासनाच्या नियंत्रणाखाली प्लांट मधील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र कष्ट करून ऑक्सिजन तयार करत आहेत त्यामुळे तामलवाडी ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंचायत समिति सदस्य श्री दत्ता शिंदे, तामलवाडी  पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री सचिन अशोक पंडित,  नायब तहसिलदार स्वामी, हनुमंत गवळी, सुधाकर लोंढे, नागनाथ मसुते, प्लांट चे मालक वैभव गिल्डा, मनेंजर संतोष कुरे, प्लांट कर्मचारी हसन पठाण, दस्थिगिर पटेल, शहाबुद्दीन पटेल, हरी पिंपळे, नितेश खंडागळे, विनय नरवडे यांचा सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top