उस्मानाबाद जिल्हा परिषदेत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा

0

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस साजरा 

      उस्मानाबाद,दि. 21  :-दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस उस्मानाबाद जिल्हा परिषदेत साजरा करण्यात आला.यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड यांनी करून पुष्पहार अर्पण केला.
      यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनुमंत वडगावे,उपशिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती गायकवाड,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी पिंपळे,आरोग्य विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी गीरी, सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी हजारे,देशपांडे यांच्यासह बांधकाम विभागातील नागनाथ कुंभार यांची यावेळी उपस्थिती होती.
                                    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top