माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन, रुग्णालयात पाणी वाटप
उस्मानाबाद :- उस्मानाबाद शहरातील शाहूनगर जेत्वन कॉलनी पंचशील ध्वज चौक येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यातआले. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्याने त्याठिकाणी माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वप्निल शिंगाडे मित्रपरिवार यांच्या वतीने जोपर्यंत पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे तोपर्यंत जिल्हा स्त्री रुग्णालयात मोफत शुद्ध पाण्याचे जार उपलब्ध करून देणार असल्याची माहिती स्वप्निल शिंगाडे यांनी दिली आहे .
जिल्हा स्त्री रुग्णालय उस्मानाबाद येथे पिण्याच्या पाण्याचे शुद्ध जार चे मोफत पाणी माता रमाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यावेळी स्वप्निल शिंगाडे , डॉ स्मिता गवळी , पलवी चव्हाण , भाटे मेट्रेन , भंडारे रीदेका , रंजना दाणे व
प्रथमेश डेगळे , प्राशात कांबळे , महेश शिगांडे , स्वप्निल शिंगाडे मित्रपरिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.