म्युकर मायकोसिस ची पाहिली शस्त्रक्रिया उस्मानाबाद मध्ये यशस्वी

0

उस्मानाबाद: उस्मानाबाद शहरातील कान नाक घसा तज्ञ डॉ सचिन देशमुख यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये आह म्युकर मायकोसिसच्या एका रुग्णांवर यशस्वी पणे शस्त्रक्रिया पार पडली. उस्मानाबाद जिल्ह्यातील म्युकर मकोसीस रोगावरील ही पहिलीच शस्त्रक्रिया असून 40 वर्ष वयाच्या रुग्णालाला कोरोना नंतर म्युकर मायकोसिसचा त्रास होत होता. रुग्णाचे गाल सुजून दात हलण्याचा त्रास होत असल्याची लक्षणे दिसून येत होती.
डॉ सचिन देशमुख यांनी पेशंटच्या चाचण्या केल्या नंतर काल 25 मे रोजी तातडीने केले म्युकर मायकोसिसची शस्त्रक्रिया करण्यात आली.
 
नाकाच्या बाजूला असणाऱ्या मॅक्झिलरी सायनस वर शस्त्रक्रिया करून म्युकर मायकोसिसचे इन्फेक्शन काढून टाकण्यात डॉक्टरांना यश आले आहे. तातडीने शस्त्रक्रिया केल्याने मेंदूला किंवा डोळ्याला या दोन्हीला होणारा धोका टळला आहे.

अतिशय कमी उपलब्ध साधन सामग्रीत, उस्मानाबाद सारख्या लहान शहरात डॉ सचिन देशमुख यांनी म्युकर मायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने सर्व स्तरातून त्यांचे होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top