Osmanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण : गुन्हे दाखल.

0


Osmanabad जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण : गुन्हे दाखल.

 वाशी: गोजवाडा, ता. वाशी येथील अशोक महादेव जाधव यांसह 4 कुटूंबीय व गावकरी- दिपक किसन थोरबोले यांसह 2 कुटूंबीय अशा दोन्ही कुटूंबाचा दि. 28.04.2021 रोजी रोजी 18.00 ते 18.30 वा. चे दरम्यान गोजवाडा शेत शिवारात पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाला. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अशोक जाधव व दिपक थोरबोले यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत वाशी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

 

 लोहारा: समुद्राळ, ता. उमरगा येथील कोकाटे कुटूंबातील दिगंबर, सुनिता, राणी, पुजा, वैभव, नवनाथ, अनुसया अशा सात जणांनी कौटुंबीक वादाच्या कारणावरुन दि. 30.04.2021 रोजी 13.00 वा. सु. समुद्राळ येथे गावातील नातेवाईक- आदिनाथ कोकाटे यांसह त्यांच्या बहिणीस शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कोयत्याने व लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या आदिनाथ कोकाटे यांनी 01 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

 

 उमरगा: एकोंडी (ज.), ता. उमरगा येथील अनिता सुरवसे यांचा दि. 29.04.2021 रोजी 12.00 वा. सु. त्यांच्या वडीलांचे शेत नांगरत असलेले गावकरी- राहुल सोपान कांबळे व पवन राजेंद्र गायकवाड यांच्यासोबत नांगरणीवरुन वाद झाला. यावर नमूद दोघांसह वनिता गायकवाड, सिमंता कांबळे, विनोद कांबळे, करण गायकवाड, अशोक कांबळे अशा सात जणांनी मिळुन अनिता सुरवसे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. यावेळी अनिता यांच्या बचावास आलेला त्यांचा मुलगा- भुजंग व भाऊ- दिपक यांनाही नमूद सात जणांनी काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अनिता सुरवसे यांनी 01 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

                                                        

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top