राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्यांक विभाग)चे प्रदेश अध्यक्ष मोहम्मद खान पठाण यांचे तुळजापूर शहरात राष्ट्रवादी तर्फे मोठे स्वागत व सत्कार
तुुुळजापुर :-( प्रतिनिधी )
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्यांक विभाग)चे प्रदेशअध्यक्ष मोहम्मद खान पठाण व त्यांच्या सोबत प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख, हुजूर इनामदार,वसीम बुऱ्हाण,सोलापूर जिल्हाध्यक्ष फारोक मटके,उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष कादर खानसाब, इलियास पिरजादे हे सर्व तुळजापूर येथे रेस्ट हाऊस वर तालुक्यातील राष्ट्रवादी चे नेते व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तालुक्यातील परिस्थिती चा आढावा घेतला.अल्पसंख्यांक समाजाचे अडचणी जाणून घेतल्या व अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले व येणाऱ्या काळात पक्षाचे अध्यक्ष श्री शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्या साठी तालुक्यात पक्षाची मजबूत बांधणी करण्याचे आदेश दिले
या वेळी प्रदेश अध्यक्षांचे सत्कार तालुक्याचे जेष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील,दिलीप नाना मगर यांनी केले या वेळी संदीप गंगणे, बबन गावडे,नितीन आबा रोचकरी,गोरख भाऊ पवार,फेरोज पठाण,मकसूद शेख,तौफिक शेख, वाहेद भाई शेख,अमीर भाई शेख, अभय माने रफिक भाई शेख व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते