मराठा सेवा संघाच्या पुनर्गठनासह विविध विषयावर बैठकीत चर्चा : मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी लढा उभा करणार

0

मराठा सेवा संघाच्या पुनर्गठनासह विविध विषयावर बैठकीत चर्चा 

मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी लढा उभा करणार

उस्मानाबाद दि.२८ (प्रतिनिधी) - 
मराठा सेवा संघ आणि ३३ कक्षांचे पूनर्गठन व नवीन कार्यकारिणी बांधणी प्रक्रीया यासाठी मराठवाडा विभाग समितीच्यावतीने जिल्हा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, कृषी परीषद, वीर भगत सिंग विद्यार्थी परीषद आदी कक्षाच्या कार्याचा आढावा  घेण्यात आला. यावेळी ३३ कक्षांशी समन्वय साधणे, संभाजी ब्रिगेडची बांधणी, सर्व कक्षांचा विस्तार आणि मराठा समाजास ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करुन आरक्षण मिळविण्यासाठी लढा उभारण्याबाबत विचार मंथन करण्यात आले. या बैठकीस समिती प्रमुख तथा मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी, विभागीय अध्यक्ष डॉ.आर.एस. पवार , डॉ.पंजाबराव देशमूख शिक्षक परीषदेचे राज्य संघटक व्यकंटराव जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक सुदर्शन तारख, राज्य संघटक अतुल गायकवाड, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष  इंजि. तुषार पाटील, संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष राहुल वायकर, सचिव डॉ. सिद्धेश्वर जाधव, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी, बीड जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे, कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शेळके, संत गाडगेबाबा परिषदेचे जिल्हाध्यक्ष शेळके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष आकाश मुंढे, अक्षय नरवडे, शहराध्यक्ष आदित्य देशमुख, शहर संघटक अमर घोडके, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष निरंजन करंडे, महादेव मगर , प्रसिध्दी प्रमुख शिवदास पवार, रणजित पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top