लोहारा / प्रतिनिधी
वाढदिवसाचे अनाठाई खर्च टाळून लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडने लोहारा तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात केले सॅनिटायझर व मास्क वाटप
कोरोनाच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता लोहारा पोलिसांनी अविरत अखंड सेवा बजावल्याने तसेच महसूल कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी देखील कोरोनाच्या संकट समयी योग्य नियोजन करीत कर्तव्य बजावल्याने सन्मानपर सॅनिटायझर व मास्क वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव बालाजी यादव यांच्या वाढदिवसा निमित्त अनाठायी खर्च टाळून संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसील कार्यालय व लोहारा पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर 5 लिटर व मास्क वाटप करण्यात आले
या प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष शरद पवार, लोहारा तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, बालाजी यादव, किरण सोनकांबळे, अविनाश मुळे, महादेव मगर, प्रणित सूर्यवंशी, पवन चौधरी, तर महसूलचें नायब तहसीलदार रणजित शिराळकर भागवत गायकवाड, विनोद जाधव, वझीर मनीयार, पोलिस प्रशासनातील पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण,एस एस पांचाळ,प्रवीण नळेगावकर,सह आदी कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते