उस्मानाबाद , दि.21 ( जिमाका )ग्राम सेवक हा ग्रामीण प्रशासनातील महत्वाचा घटक आहे . त्यांच्या माध्यमातून ग्रामीण विकास विकासाचे काम केले जाते असे मत राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज येथे व्यक्त केले . उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्ह्यातील ग्रामसेवकांचा पालकमंत्री श्री . गडाख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद अंतर्गत 622 ग्रामपंचायती मधून 457 ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी कार्यरत आहेत . त्यामधून 2020-21 च्या कामकाजावर आधारीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामसेवकांना जिल्हा स्तरावर गौरविण्यासाठी प्रत्येक पंचायत समितीकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यानुसार जिल्हयातून श्री. व्यंकट लक्ष्मण सुरवसे, ग्रामसेवक पं. स. उस्मानाबाद, श्री. सी. एन. गोरे, ग्रामविकास अधिकारी पं. स. तुळजापुर, श्री. भारत बापुराव सोनवणे ग्रामविकास अधिकारी पं. स. कळंब, श्री. शरद सुखदेव बारसकर ग्रामसेवक पं. स. भुम, श्री. विकास विश्वास मदने ग्रामसेवक पं. स. परंडा, श्रीमती. जे. के. हारे, ग्रामसेवक पं. स. वाशी श्री. शिवानंद बिराजदार ग्रामविकास अधिकारी पं. स. लोहारा, श्री. एस. एस. कांबळे, ग्रामविकास अधिकारी पं. स. उमरगा यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा स्तरावर पालकमंत्री श्री .गडाख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री यांनी सर्व सत्कारमुर्तीचे अभिनंदन करुन ग्रामसेवकांनी ग्रामीण विकासातील त्यांचे योगदान व महत्व लक्षात घेऊन प्रेरणादाई काम करण्याचे आवाहन केले.
अशाप्रकारे ग्रामसेवकांचा गौरव करुन प्रोत्साहीत करणारी राज्यातील एकमेव जिल्हा परिषद आहे .जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या संकल्पनेतुन हा कार्यगौरव साकारण्यात आला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती. अस्मिता कांबळे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार श्री. कैलास पाटील , जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड , पोलिस अधिक्षक श्री. राजतिलक रोशन, श्रीमती उषा यरकळ जि. प. सदस्या, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमाणपत्र देवुन गौरव करण्यात आला. या प्रसंगी श्री. नितीन दाताळ उप मुख्य कार्यकारी अधिकारी, (पंचायत) श्री. एम. के.शिनगारे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. बाळासाहेब शिंदे. क. स. व श्रीमती एम. के. डोईफोडे, क. स. हे उपस्थित होते.
******