उस्मानाबादेत जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची हेळसांड ; महिला निगेटिव्ह असताना पाँझीटिव्ह दाखवले !
प्रसुतीसाठी सोलापूरला पाठवल्याची नातेवाईंनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
उस्मानाबाद / प्रतिनीधी
उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये प्रसूती दरम्यान आलेल्या महिलेची हेळसांड झाल्याबाबत तक्रार सदर महिलेच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये येडशी गावातील शाहीन अझरोद्दीन पटेल ही महिला प्रसुतीसाठी आली होती. तिची कोरोना चाचणी करण्यात आली covid-19 रिपोर्ट स्त्री रुग्णालयात पाँझीटिव्ह दाखवली .परंतू त्या महिलेला कोरोना सद्रश्य कोणतेही लक्षण नसल्यामुळे महिलेच्या नातेवाईंनी उस्मानाबाद येथीलच डाँ.मुळे यांचे श्रीयश हाँस्पीटलमध्ये परत त्या महिलेची चाचणी केली असता निगेटिव आली सदर प्रकार हा दि.१३/६/२०२१ रोजी घडला नातेवाईक रफिक पटेल यांनी याबाबत उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
महिलेची टेस्ट निगेटिव्ह असताना पॉझिटिव दाखवले असे तक्रारीत नमूद केले आहे सदर महिलेला उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल केले होते त्या महिलेचा रिपोर्ट पाँजिटिव दाखवल्यामुळे सदर नातेवाईकांनी त्या महिलेची उस्मानाबाद येथीलच डाँ.मुळे यांच्या खाजगी रुग्णालयात श्रीयस हॉस्पिटल मध्ये केली असता त्या महीलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला सदर रिपोर्ट घेऊन नातेवाईक परत जिल्हा स्त्री रुग्णालयात गेले असता तेथून आयुर्वेदिक कोविड सेंटर येथे पाठवण्यात आले परंतु त्याठिकाणी प्रसूतिवेळी जर सिजर करण्याची वेळ आली तर त्या ठिकाणी सिजर होत नसल्याचा सल्ला कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना दिला त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी सोलापूर येथे नेण्याचे ठरवले त्यानंतर याच रुग्णाचा सोलापूर येथे आर टि पी सी आर व अँटिजन टेस्ट करण्यात आली दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले असून सदर रुग्ण हा जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहे.त्या महिलेला मुलगी झाली आहे आई व बाळ ठणठणीत आहे. सदर घडलेला हा प्रकार जिल्हा स्त्री रुग्णालय हलगर्जीपणामुळे झाला आहे कदाचित अशा चुकीच्या रिपोर्ट मुळे नाहक एखाद्या रुग्णाच्या जीवावर बेतू शकतो ते नाकारता येत नाही तरी संबंधित जे कोणी या प्रकरणांमध्ये चुकीची माहिती देऊन रुग्णांची हेळसांड केली आहे त्या संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रुग्णाचे नातेवाईक रफिक पटेल राहणार येडशी तालुका उस्मानाबाद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे सदर निवेदन हे दिनांक 16 जून 2021 रोजी जिल्हाधिकार्यांना दिले आहे. निवेदन देतेवेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष हुकमत मुलाणी , उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष विकास उबाळे ,जिल्हा उपाध्यक्ष अनंत साखरे ,पत्रकार प्रशांत गुंडाळे , भागवत शिंदे , अमिर शेख , सुभान शेख , राहुल कोरे , आदी उपस्थीत होते.