उस्मानाबाद जिल्ह्यात 5 जुलै पासुन तिसर्या स्तराचे नियम पुढील आदेश येईपर्यंत लागु , Osmanabad district, the third level rule will be enforced from July 5 till further orders

0
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी covid-19 च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनेनुसार 5 जुलै पासून जिल्ह्यात पुढील आदेश येईपर्यंत निर्बंध मागणी सर्व सर्व निर्बंध पुढे सुरू ठेवले आहेत
 
आदेश - ज्याअर्थी उपरोक्त वाचा क्र . 2 चे अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र शासनाने ' महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम , 2020  प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र . 3 नुसार करोना विषाणुमुळे ( COVID - 19 ) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे . ज्याअर्थी महाराष्ट्र शासनाने कोव्हिड 19 या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने संदर्भ क्र . 4 मध्ये नमूद दि . 25 जून 2021 च्या आदेशान्वये ' Levels of Restrictions for SAFE MAHARASHTRA ' अंतर्गत सर्व प्रशासकीय विभागांमध्ये State Level Triggers लागू केले आहे व प्रशासकीय विभागाचा ( जिल्ह्याचा ) कोविड -19 सकारात्मक अहवाल असलेल्या रुग्णांचा साप्ताहिक दर ( Weekly Positivity Rate ) व वापरात असलेल्या ऑक्सीजन बेइसची टक्केवारी यांचा विचार न करता प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये संदर्भ क्र . 4 मधील दि . 04 जून 2021 च्या आदेशात नमूद असलेले कमीत कमी स्तर क्र . 3 ( Level 3 ) मधील निबंध लागू होतील असे आदेशित केले आहे . त्याअर्थी संदर्भ क्र . 5 च्या आदेशान्वये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये करावयाच्या कार्यवाहीबाबत देण्यात आलेले निर्देश दि . 05 जुलै 2021 पासून पुढील आदेशापर्यंत जशास तसे कायम लागू राहतील असे आदेशित करण्यात येत आहे . सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 , महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 तसेच भारतीय दंड संहिता ( 45 ऑफ 1860 ) कलम 188 व इतर लागू होणा - या कायदेशीर तरतुदीनुसार दंडनियाकायदेशीर कारवाईस पात्र राहील . असे आदेशात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top