बँकेची केवायसी ( Bank KYC ) करायची म्हणून 60 हजार रुपयांची फसवणूक!

0



उस्मानाबाद :-  उस्मानाबाद पंचायत समितीचे सेक्शन इंजीनिअर नारायण शिंदे यांच्या  मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल धारकाने  दिनांक 03 जुलै रोजी लघुसंदेश  करुन “बॅंकेला  तुमच्या खात्याची  केवायसी करायची असुन  24 तासात केवायसी ( Bank KYC ) (ग्राहकाची खातरजमा) न केल्यास तुमचे बँक खाते बंद होईल. याकरीता तुमच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाचे छायाचित्र पाठवा. ” यावर शिंदे यांनी सारासार विचार न करता त्या अज्ञातावर विश्वास ठेवुन आपल्या बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाचे छायाचित्र त्यास पाठवले. त्यानंतर शिंदे यांच्या भ्रमणध्वनीवर एक लघुसंदेश आला असता शिंदे यांनी तो संदेश वाचुन समजुन न घेता त्यातील गोपनीय ओटीपी क्रमांक त्या अज्ञाताने विचारला असता  सांगितला असता शिंदे यांच्या बॅक खात्यातुन 60,000 रु रककम अन्यत्र स्थलांतरीत झाली.

अशा मजकुराच्या नारायण शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 420, 66 (सी) (डी) कायदा  अंतर्गत आनंद नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोदंविला आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस माहिती विभागाकडून देण्यात आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top