तेरा गुन्हयांतील घरफोडी व लुटीच्या मालासह चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

0



उस्मानाबाद :-   स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय खबरेच्या आधारे स्थागुशाच्या  पोनि-गजानन  घाडगे, पोउपनि-माने, भुजबळ, पोना- सय्यद, पोकॉ-जाधवर, मारलापल्ले , आरसेवाड, ढगारे, ठाकुर यांनी  आज दि 06.07.2021 रोजी आरोपी किरण विलास भोसले, रा.सिंदगाव ता.तुळजापूर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने अन्य सहका-यांसह  जिल्हा भरात नळदुर्ग पो.ठा  हददीत 05 गुन्हे, लोहारा 03 गुन्हे ,तुळजापूर 02 गुन्हे , उमरगा, बेंबळी, आनंदनगर पो.ठा हददीत प्रत्येकी 01 असे एकुण  12 घरफोडी व एक  लुटमारीचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पथकाने त्याच्या ताब्यातुन वर नमुद 13 गुन्हयांत चोरी केलेले 160 ग्रॅम सुवर्ण दागिने किंमत 7,52,000 रुपये , 80 ग्रॅम चांदी किंमत 5,200 रुपये व रोख रक्कम 89,000 रुपये असा एकुण  8,46,200 रुपये  किंमतीचा  माल जप्त केला आहे. पोलीस त्याच्या उर्वरीत साथीदारांचा शोध घेत असुन पुढील तपास संबंधीत पोलीस ठाण्यां मार्फत केला जाणार आहे.  

अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top