उमरगा-लोहारा शिवसेनेच्या वतीने पूरग्रस्त गावांना मदत रवाना , केवडाई व धामणीची वाडी गावातील सर्व कुटुंबा साठी संसारोपयोगी साहित्य
उमरगा (महादेव पाटील)
कोरोनासदृश्य परिस्थिती व कोकण भागातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सर्वांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाढदिवस साजरा न करता याऐवजी पूरग्रस्तांसाठी थेट अथवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत करण्याचे आवाहन केले होते. या अनुषंगाने उमरगा लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने रायगड जिल्ह्यातील केवडाई व धामणीची वाडी ता.पोलादपूर या गावातील सर्व कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल इतके अन्नधान्य, किराणा साहित्य, व इतर संसारोपयोगी साहित्य पाठविण्यात आले. सदर सर्व साहित्य घेऊन शिवसैनिक मंगळवारी पूरग्रस्त गावांकडे निघाले असून यावेळी मा.खासदार प्रा.रविंद गायकवाड सर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या गाड्यांना रवाना करण्यात आले.
यावेळी युवानेते किरण गायकवाड, डॉ.उदय मोरे,ऍड.प्रवीण तोतला, बाजार समितीचे सभापती मोहियोद्दिन सुलतान, शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, उद्योजक बळीराम सुरवसे, शेतकरी सेना जिल्हा संघटक विलास भगत, शेतकरी सेना तालुकाप्रमुख बलभीम येवते, विजयकुमार नागणे, महावीर अण्णा कोराळे, अशोक इंगळे, बाजार समिती संचालक सचिन जाधव, व्यंकट पाटील, विधानसभा अध्यक्ष शरद पवार, योगेश तपसाळे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र सुरवसे, नगरसेवक पंढरीनाथ कोणे, शिवसेना विभागप्रमुख आप्पाराव गायकवाड, प्रदीप शिवनेचारी, दत्ता डोंगरे, शरद इंगळे, लिंगराज स्वामी, खय्युम चाकुरे गोपाळ जाधव, ज्ञानेश्वर पाटील, मनोज जाधव, बालाजी जाधव, सुधाकर भोसले, श्रीधर घोटाळे, भीमाशंकर गायकवाड, विजय भोसले, सौदागर सूर्यवंशी, हैदर शेख, महादू क्षीरसागर, योगेश शिंदे, कृष्णा मुळे, मुजीब इनामदार, ज्ञानेश्वर सांगवे, आकाशराजे, पंकज जगताप आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मदत कार्य व श्रमदान करण्यासाठी गेलेले शिवसैनिक नगरसेवक पंढरीनाथ कोणे, शरद पवार, संदीप चौगुले, दौलत सुरवसे, नागेश मंडले, अतुल घंटे, राहुल अष्टीकर आदी होते