उस्मानाबाद - वृक्षारोपण ही काळाची गरज असून, त्याविषयी जनजागृती करत उस्मानाबाद मध्ये महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य, विवेकानंद युवा मंडळ उस्मानाबाद, नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद, तेजस्विनी फाऊंडेशन व मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. शहरामध्ये पर्यावरणपूरक व भरपूर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या वृक्षांच्या 100 रोपांची लागवड करण्यात आली असून, त्यांच्या पुरेपूर संगोपनाची देखील काळजी घेण्यात येणार आहे. वृक्षारोपणासाठी ४ फूट ते ५ फूट उंची असलेले वड, पिंपळ, सप्तपर्णी, कडूनिंब व इतर वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमासाठी वृक्षांचे रोपण करताना महिलांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, वड या वृक्षाचे रोपण करताना महिलांनी त्या वृक्षांची पूजा करून घेतली. वृक्षारोपण कार्यक्रमासाठी श्री. संभाजी दळवी सर व नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी धनंजय काळे साहेब यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. यावेळी विवेकानंद युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, वैभव कुलकर्णी, अनिकेत माने, शुभम कदम, तेजस्विनी फाऊंडेशनचे अँड. तेजश्री पाटील, अँड. सोनाली वडगावकर, मावळा प्रतिष्ठानचे रोहित भोंग, कृष्णा सुरवसे, अमित भोंग, अर्जुन सुरवसे, ओंकार भोसले, राजदरबार हाँटेलचे आबा सुरवसे, बळीराम माळी, माळवदे साहेब, चव्हाण साहेब यांचे सहकार्य लाभले. ज्येष्ठ नागरिकांनी देखील या कार्यक्रमाला खूप मोठे असे सहकार्य केले.