तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी नगरपरिषद नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांचे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुळजापूर यांना निवेदन

0
तुळजापूर :-  शहरामध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी नगरपरिषद नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांचे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुळजापूर यांना निवेदन


 दिनांक, १५ जुलै २०२१,रोजी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांचे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन तुळजापूर यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजापूर शहरामध्ये मंगळवार दिनांक १३ जुलै २०२१, रोजी मध्यरात्री २:०० वाजता २७ वर्षीय तरुणीवर एका अज्ञात नराधमांनी बलात्कार केला,तो आरोपी अद्याप फरार आहे, त्यास तात्काळ अटक करून कठोर शासन व्हावे आणि पीडितेला योग्य ती वैद्यकीय सेवा, व उपचार मिळावे, तसेच पीडितेला सर्व शासकीय मदत तात्काळ मिळावे, तुळजापूर शहरातील विविध भागांमध्ये वरील प्रमाणे घटना होऊ नये, यासाठी शहरातील सर्व भागांमध्ये पोलीस गस्त  वाढविण्यात यावी अशी विनंतीही करण्यात आली आहे, या निवेदनावर  नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी, यांची स्वाक्षरी आहे, यावेळी किशोर साठे, औदुंबर कदम, उपस्थित होते.

बातमी संकलन :-  रूपेश डोलारे , तुळजापूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top