कळंब तालुका भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणी जाहीर

0


उस्मानाबाद :- युवा मोर्चा कार्यकारिणी भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.आ.श्री.सुजितसिंह ठाकुर, जिल्हायाचे लोकनेते मा.आ.श्री. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्रि.नितीनजी काळे, तसेच युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वा खाली व तालुकाध्यक्ष मा.श्री.अजित पिंगळे यांच्या सहमतीने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
कळंब तालुका भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणी लोकनेते आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या ‍ उपस्थितीत आज ‍दि.14 जुलै 2021 रोजी जाहीर करण्यात आली. यावेळी युवा मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करताना आ.राणादादा म्हणाले की युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मिळालेल्या जबाबदारीच्या फायदा घेवून युवकांचे प्रश्न तसेच समाजातील अन्य छोटे-मोठे समस्या मार्गी लावून समाजकार्य करावे. या बरोबरच कळंब तालुक्याचे ‍भवितव्य घडविण्याची क्षमता ही युवा मोर्चाच्या कार्यकरत्यांमध्ये आहे व प्रत्येक बुथवर युवा कार्यकर्त्यांची स्वतंत्र टिम करण्यास सांगुन सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्हयात युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राज‍सिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वात युवा मोर्चा अधिक ताक्तीने काम करत आहे, व आपण जगातील सर्वांत मोठया राजकिय पक्षाचे पदाधिकारी झाले असून कळंब तालुक्यातील प्रशांत लोमटे हे यांच्या नेतृत्वात चांगले काम होत आहे असे सांगीतले, यामुळे आपण आता अधिक ताकदीने कार्य केले पाहिजे तसेच जिल्हा समन्वयक नेताजी पाटील यांनी नविन पदाधिकाऱ्यांना  शुभेच्छा देताना आपल्या माध्यमातून पक्ष अधिक बळकट होईल असा आशावाद व्यक्त केला.
याच बरोबर प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुधीर आण्णा पाटील यांनीही सर्व नुतन कार्यकारिणी ही सर्वसमावेशक असल्याचे सांगून येणाऱ्या निवडणूकांच्या दृष्टीकोनातून काम करावे असे  सांगीतले. तालुकाध्यक्ष  अजितदादा  पिंगळे यांनी सर्व नविन युवा टिम  ही‍ अतीशय सर्मथ पणे काम करणारी असून यामुळे तालुक्यात पक्ष ‍ अधिक बळकट होईल असे सांगीतले. भारतीय जनता युवा मोर्चाचे  जिल्हाध्यक्ष  राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी ‍  नविन पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सर्वांनी आपल्या पदास सक्रीयपणे काम करुन न्याय ‌दयावा व युवा मोर्चा व युवा वॉरीयर्सची शाखा प्रत्येक भागात काढायचा मानस व्यक्त केला व या पुढील काळात पक्ष देईल ती जबाबदारी युवा मोर्चा सक्रीयपणे पार पाडील असे आशवस्त केले.
या कार्यकारणीमध्ये :- तालुका उपाध्यक्ष पदी - श्री.अशोक गायकवाड, सुजीत काळदाते, कृष्णा कोल्हे, रोहीत मुंडे, सचिन पवार, संतोष सावंत, सचिन गंभीरे, तालुका सरचिटणिसपदी-श्री.सोमनाथ ‍‍टींगरे, बालाजी मडके, अभीजित पाटील, अमर बारकुल, तालुका   चिटणिसपदी - उमेश गायकवाड, रमेश नाईकनवरे, समाधान कानडे, राजकुमार यादव, अशोक महाजन, तालुका कोषाध्यक्ष पदी - रणजित  दिवाने, सोशल मिडीया अध्यक्ष पदी-तुषार बाराखोते, सोशल मिडीया उपाध्यक्षपदी-संदीप कोकाटे, प्रशांत बांगर यांची  निवड करण्यात आली आहे.
                                    या कार्यक्रमास माजी ‍ जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, जिल्हा समन्वयक नेताजी पाटील, प्रदेश
                        कार्यकारिणी सदस्य सुधीर आण्णा पाटील,‍ सतीश दंडनाईक, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, तालुकाध्यक्ष
                        प्रशांत लोमटे, अरुण चौधरी, मकरंद पाटील, प्रणव चव्हाण, ॲड.रामराजे जाधव व कळंब तालुक्यातील भाजपाचे
                        अनेक सरपंच व युवा मोर्चाचे कार्यकरते मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top