उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी , दोन ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल

0
उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी , दोन ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल 

                          चोरी.”

पोलीस ठाणे, वाशी : सौदागर नवनाथ जगताप, रा. वाशी हे दि. 14 जुलै रोजी कुटूंबीयांसह आपल्या घरात झोपलेले असतांना रात्री 04.00 वा. सु. चार अनोळखी व्यक्तींनी घराचा कडी- कोयंडा तोडून सौदागर जगताप यांना चाकुने मारहान करुन गंभीर जखमी केले. तसेच कुटूंबीयांना चाकुचा धाक दाखवून घरातील 30 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने व 13,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या स्वाती सौदागर जगताप यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 457, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.) : कुलभुषण प्रल्हादराव माने, रा. वडगाव (सि.), ता. उस्मानाबाद हे दि. 14 जुलै रोजी रात्री वडगाव येथील आपल्या घर बांधकामाच्या ठिकाणी झोपलेले असतांना त्यांच्या उशाचे दोन स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या कुलभुषण माने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, ढोकी : रमेश निवृत्ती जाधव, रा. जागजी, ता. उस्मानाबाद यांच्या जागजी गट क्र. 97 मधील शेतातील सौरऊर्जा संचाचे साहित्य व 150 फुट वायर दि. 10- 11 जुलै दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या रमेश जाधव यांनी दि. 14 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
                          “मारहाण.”

पोलीस ठाणे, तुळजापूर : चैतन्य मारुती माने, रा. काक्रंबा, ता. तुळजापूर हे दि. 13 जुलै रोजी 18.00 वा. सु. विश्वनाथ कॉर्नर, तुळजापूर येथे थांबले होते. यावेळी आशिष मोतिराम खंदारे, रा. तुळजापूर यांचा माने यांना धक्का लागल्याने माने यांनी त्यांना त्याचे कारण विचारले असता खंदारे यांनी माने यांना शिवीगाळ करुन काचेची बाटली माने यांच्या डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या चैतन्य माने यांनी दि. 14 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
पोलीस ठाणे, लोहारा : मुर्शदापुर, ता. लोहारा येथील सुषमा रंगराव कांबळे कुटूंबीय व नातेवाईक यांचा गावकरी- करुणा बालाजी खरोसे कुटूंबीय व नातेवाईक अशा दोन्ही गटांचा दि. 11 जुलै रोजी 06.30 वा. सु. राहत्या गल्लीत जुन्या वादातून संघर्ष उद्भवला. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटातील स्त्री- पुरुषांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुषमा कांबळे व करुणा खरोसे यांनी दिलेल्या परस्परविरोधी प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 325, 324, 452, 504, 506 अंतर्गत 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

                                                                                   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top