उस्मानाबाद दि.४ (प्रतिनिधी) - उस्मानाबाद जिल्हा वीटभट्टी मालक युनियनची स्थापना करण्यात आली आहे. या युनियनच्या कार्यकारणीची निवड करण्यासाठी बैठक घेण्यात घेऊन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. या युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत साळुंके यांची तर जिल्हा कार्याध्यक्षपदी बापूसाहेब कणे यांची निवड करण्यात आली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील वीट भट्टी मालकांचे अनेक प्रश्न असून ते सोडविण्यासाठी संघटनेची आवश्यकता होती. यासाठी जिल्ह्यातील वीट भट्टी मालकांची दि.४ जुलै रोजी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. यावेळी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये
जिल्हा उपाध्यक्षपदी शेख शौकत नूरुद्दीन तर
सचिव म्हणून शंकर साळुंके, सहसचिवपदी प्रमोद गायकवाड व कोषाध्यक्षपदी शौकत शेख, जिल्हा संघटकपदी बाबा रोटे, उस्मानाबाद शहराध्यक्षपदी गुणवंत काकडे तर जिल्हा सदस्यपदी सलमान मुल्ला, रिझवान मुजावर, खाजामियॉं मुलांनी, दत्ता चव्हाण, प्रमोद मोरे, अलीम शेख, सलाउद्दीन शेख व अब्दुल करीम कुरेशी, जमील, अखिल, हुसेन खाजा, सास्तुरे, वाकुरे व जाफर मुजावर यांचा समावेश करण्यात आला आहे.
या बैठकीत विविध विषयावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. यामध्ये मजुरांकडून वीट भट्टी मालकांची होणारी फसवणूक, विटांचे दर, रॉयल्टी, ऊसतोड कामगार यांच्या प्रमाणे वीट काम करणाऱ्या मजुरांना सोयी सुविधा देण्यात याव्यात, वीट उद्योगास लघु उद्योगाचा दर्जा देण्यात यावा यासह इतर विषयावर चर्चा करण्यात आली. तर लहान वीट प्रति हजारी ७ हजार रुपये व ठोकळा विट प्रती हजारी १४ हजार रुपये दराने विक्री करण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीस भैया देशमुख, नरसिंह गंगाधर, नलिन पिंपळे, मुखीम शेख, मारुती विधाते, चांद मुजावर, सत्तार कुरेशी, मोबीन खान, सचिन कळमकर, शहाजी शिरसाट, तानाजी चव्हाण, महबूब बागवान, मनोज घोगरे बापूसाहेब घोगरे, शिवाजीराव गोरे, श्रीनिवास रणदिवे व ज्ञानेश्वर बनसोडे आदीसह जिल्ह्यातील वीट भट्टी मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.