जमियते उलमा-ए- हिंदची पुरग्रस्तांसाठी मदत रवाना
उस्मानाबाद दि.३१ (प्रतिनिधी) - कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातल्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी येथील जमियते उलमा-ए- हिंदच्यावतीने जीवनावश्यक साहित्यांची मदत दि.३१ जुलै रोजी रवाना करण्यात आली. जमियते उलमा-ए-हिंदच्यावतीने उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, तहसिलदार तुषार बोरकर यांनी जीवनावश्यक वस्तूंचे ४०५ किट घेऊन जाणाऱ्या वाहनास हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. यावेळी मौलाना आयुब, मौलाना अहमद, मौलाना इम्रान, मौलाना ताहेर, अयाज शेख, खुदूस भाई, आरिफ भाई आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.