तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ऐतिहासिक जामा मज्जिद ची दुरावस्था, ऐतिहासिक वास्तू कडे प्रशासनाचे व पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष, दुरुस्ती करण्यात यावी याबाबत जुबेरपाशा शेख यांची मागणी

0

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील ऐतिहासिक जामा मज्जिद ची दुरावस्था, ऐतिहासिक वास्तू कडे प्रशासनाचे व पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष, दुरुस्ती करण्यात यावी याबाबत,जुबेरपाशा शेख यांची मागणी

उस्मानाबाद :- सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर काटी हे एक गाव आहे, ऐतिहासिक आणि अत्यंत सुंदर ठेवा तुमची आमची वाट पाहतोय, आणि हा ऐतिहासिक आणि सुंदर ठेवा नेमका काय आहे हे जाणून घेऊ या,

अनेक भौमितिक रचनानी ही सजलेली मशिद, इस्लामिक स्थापत्य शैलीचा एक उत्तम नमुना आहे, मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रातील सुंदर मशीद म्हणून या मशिदीची ख्याती आहे, मशिदीच्या चारी बाजूनी मिनार आहेत, मिनारावर कमळाच्या आकाराच्या पाकळ्या आहेत, छोटासा घुमट गोलाकार बांधून त्याच्या मध्यभागावर ठेवण्यात आला आहे, तसेच दोन ते तीन एकर जमिनीवर याचा वावर आहे, इतिहासकार कुशल दलाल यांच्या अभ्यासानुसार काटी हे गाव निजामशहा, आदिलशहा, हैदराबादच्या निजाम यांच्या सत्तेचा एक महत्त्वाचा केंद्र होता, सेनापती याकूब मेमन च्या पत्नीने त्यांच्या निधनानंतर पतिची आठवण म्हणून ही मशीद स्वतःच्या पैशातून बांधले आहे, या मशिदीचे बांधकाम बादशहा ब्रुहानशहा चा कालखंड झाले आहे, इतिहासकार यांच्या मते याकूब मेमन यांची कबर देखील या मशिदीच्या समोर बांधण्यात आली असावी असे म्हणणे आहे, वर्षानुवर्षे प्रसिद्धीच्या व  विकासापासून वंचित असलेली ऐतिहासिक वास्तू आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, या मशिदीची खूपच दुरवस्था झाली असून याकडे पुरातत्त्व विभाग व शासनाचे दुर्लक्ष होत आहे, ही वास्तुकला नामशेष होऊ नये म्हणून गावकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, याची दुरुस्ती तात्काळ व्हावी अशी मागणी जुबेरपाशा शेख व ग्रामस्थांनी अर्जाद्वारे केली आहे. या अर्जावर जुबेरपाशा शेख यांची स्वाक्षरी आहे.


बातमी संकलन :- रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top