उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी मारहाणीचे व तीन ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल
मारहाण.
पोलीस ठाणे वाशी : रेशमा निखील भोसले यांसह पती-निखील, सासरे-तात्या, सासु-रेणुका ,मुलगी-दिक्षा यांना रा.डोकेवाडी हे दिनांक 04 जुलै रोजी 20.00 वा आपल्या घरात होते. यावेळी जामखेड येथील नातेवाईक 1)विक्या उर्फ विक्या भोसले , 2)नागेश भोसले, 3)अनुल उर्फ भैय्या भोसले तिघे रा. डोकेवाडी व 4)भोलडया काळे यांनी मागील भांडणाचा रागातुन नमुद रेशमा भोसले कुटुंबीयांस शिवीगाळ करुन दगडाने , काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रेशमा यांनी दिनांक 04 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं 324,323, 504,506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे ढोकी: चद्रसेन सुदामा कांबळे, रा. पळसप हे दिनांक 04 जुलै रोजी 07.30 वा नातेवाईक कुमार व प्रमोद नागनाथ गायकवाड या भावांसह आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी गावकरी मंगल व संजय रमेश कांबळे, अर्जुन व भिमा बब्रुवान सुर्यवंशी यांनी जुन्या वादातुन शिवीगाळ करुन कंबर पटटा, दगडाने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या चंद्रसेन यांनी दिनांक 05 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं 324,323, 504,506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे ढोकी: जागजी येथील जयकुमार व विजयकुमार महादेव देशमुख हे दोघे बंधु दिनांक 04 जुलै रोजी 19.00 वा गावातील रस्त्यावर असतांना भाउबंद –विजयकुमार माणीक देशमुख यांच्याशी पाण्याच्या नळा भोवती दगड लावण्याच्या कारणातुन वाद झाला. यावेळी विजयकुमार माणीक देशमुख यांनी जयकुमार व विजयकुमार महादेव देशमुख यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. यात विजयकुमार यांच्या गुडघ्याचे हाड मोडले. अशा मजकुराच्या जयकुमार महादेव देशमुख यांनी दिनांक 05 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं 326, 324, 504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“ चोरी.”
पोलीस ठाणे येरमाळा: रत्नापुर , ता.कळंब येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचा कडी-कोयंडा दिनांक 04-5 जुलै दरम्यानच्या रात्री अज्ञाताने उचकटुन एक एल ई डी टि.व्ही. चोरुन नेला. अशा मजकुराच्या शाळा शिक्षक भाउसाहेब जाधवर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे तामलवाडी: सुरतगांव गा्रमपंचायतीने गावातील शेततळयात लावलेला तीन अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विदयुत पम्प अज्ञाताने दिनांक 28-29 जुन दरम्यानच्या रात्री चोरुन नेला. अशा मजकुराच्या गा्रमसेवक बापुराव दराडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे नळदुर्ग: संजय चव्हाण यांनी बाभळगाव तलावावर लावलेला दहा अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विदयुत पम्प अज्ञाताने दिनांक 24-25 जुन दरम्यानच्या रात्री चोरुन नेला. अशा मजकुराच्या संजय चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.