सांगवी (का) :- तुळजापुर तालुक्यातील सांगवी काटी येथे असणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेमध्ये क्लर्क या पदावर नव्याने रुजू झाल्याने.
सांगवी (का)येथील शेतकर्यांच्या वतीने श्री गोपाळ खडसे यांचा शाल,पुष्प, व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.आज त्यांच्या जीवनातील शासकीय बँकिंग क्षेत्रातील सेवेमधील पहिला दिवस असल्याने त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा ही देण्यात आल्या. यावेळी शेतकरी रामदास मगर, सोमनाथ मगर, धनाजी डोके, मुबारक शेख, लक्ष्मण मगर, भिमा भुईरकर, विश्वनाथ सुरवसे उपस्थित होते