निवडणुकीच्या तोंडावर मनसेत जोरदार इनकमिंग

0

उमरगा :- 

निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव, सालेगाव, विलासपुर पांढरी व खेड गावच्या असंख्य कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.१२) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस शेडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन व तालुकाध्यक्ष अतुल जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन लोहारा तालुक्यातील सास्तुर, राजेगाव, सालेगाव, विलासपुर पांढरी व खेड गावच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस शाडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.निवडणुकांच्या तोंडावर पक्षाची ताकद वाढताना दिसत आहे. सास्तुर येथील शासकीय विश्रामगृहात दिलीप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडनुकाबाबत चर्चा करून निवडणुकीला पदाधीकारी कार्यकर्ते यांनी संपुर्ण तकतीने कामाला लागण्याचे आदेश दिलीप धोत्रे यांनी दिले. या वेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, उपजिल्हाध्यक्ष अविनाश साळुंके, उमरगा तालुकाध्यक्ष हरि जाधव, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव, तालुक संघटक अजय पवार, तालुका उपाध्यक्ष दादा रवळे, सतिष बनसोडे, विध्यार्थी सेना तालुकाध्यक्ष विवेक बनसोडे, तालुका सचीव संदीप मोरे आदींच्या हस्ते दत्ता शिंदे, वैभव पाचांळ, रामेश्वर माने, किशोर मिटकरी, गजेंद्र कोळी, करण औरादे,
आशपाक सवार,  आदित्य पांचाळ, आविनाश मुळे, शंकर सुरवसे, ओमकार सुरवसे आदींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसे पक्ष बांधणी करत असल्याचे चित्र आहे.अशातच पक्षामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

बातमी संकलन :- महादेव पाटील 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top