रमाई आवास योजनेतील तृतीय पंथीयांस जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप
उस्मानाबाद, दि.23 (जिमाका):- शहरात रमाई आवास योजनेतून अनेक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला, तर अनेक जण प्रतिक्षेत आहेत. तृतीय पंथीयांना देखील यातून घरकूलाचे लाभ देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते एका तृतीय पंथीयास शेवटच्या हप्त्याचा धनादेश देण्यात आला.
नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे यांनी इतरही अर्धवट आणि प्रतिक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत यावेळी चर्चा केली. यावेळी समाजकल्याण अधिकारी बी.जी.अरवत, प्रकाश पवार, नगर परिषद कर्मचारी गोरोबा औचार, उल्हास झेंडे, सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे, असंघटित कामगार संघटनेचे सचिव संजय गजधने, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन धाकतोडे, लाभार्थी आदी यावेळी उपस्थित होते.