उस्मानाबाद जिल्ह्यात ४ ठिकाणी जुगार विरोधी कारवाई , ३ ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल ...
पोलीस ठाणे आनंदनगर: सादीक सययद व राजेंद्र काशीद हे दोघे ठरावीक दलाली रककम घेउन मटका बुकी-सोमनाथ चपने यांच्या करीता नगर पालीका मुख्यालया समोरील दोन टप-यांत मटका-जुगार व्यवसाय चालवत असल्याचे दिनांक 02 जुलै रोजी 15.30 वा आनंदनगर पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी ते जुगार साहित्य व अनुक्रमे 650 रु व 710 रु रक्कम जप्त करुन म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे उस्मानाबाद –शहर : श्रीराम ओव्हळ हे सांजा चौकात दिनांक 02 जुलै रोजी 19.30 वा मटका-जुगार व्यवसाय चालवत असल्याचे उस्मानाबाद-शहर पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी ते जुगार साहित्य व 1550 रु रक्कम जप्त करुन म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे तुळजापूर : राम मांगडे व विक्रम नाईकवाडी हे दोघे दिनांक 02 जुलै रोजी 20.30 वा घाटशिळ तुळजापूर येथे जुगार साहित्य व 870 रु रक्कमेसह मटका-जुगार व्यवसाय चालवत असल्याचे तुळजापूर पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी साहित्य व रककम जप्त करुन म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे उमरगा : राजेंद्र जाध्व रा.तुरोरी हे दिनांक 02 जुलै रोजी 18.30 वा गावातील हॉटेल समोर जुगार साहित्य व 450 रु रक्कमेसह मटका-जुगार व्यवसाय चालवत असल्याचे उमरगा पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी साहित्य व रककम जप्त करुन म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
पोलीस ठाणे येरमाळा: तुकाराम शिंदे रा.पानगाव, ता.कळंब हे दिनांक 29 जुन रोजी 17.00 वा आपल्या शेतात होते.भाउबंद इंदुबाई, फुलबाई, रामेश्वर,शिवाजी, माणीक यांनी शेतीच्या वादातुन तुकाराम यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी,काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. वरुन भादसं कलम 143, 148,149,323, 504,506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे परंडा : बाबुराव गोफने,रा.भोत्रा हे दिनांक 01 जुलै रोजी 20.30 वा आपल्या शेताजवळील रस्त्यावर होते. यावेळी गावकरी अजित व किशोर पवार यांनी बाबुराव यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. वरुन भादसं कलम 324, 504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे शिराढोण : बिभीषण गायके, रा. मंगरुळ हे दिनांक 02 जुलै रोजी 08.30 वा घरासमोर असतांना गावकरी पाडळे कुटुंबीय राजेंद्र, शिरु, साखराबाई, सारीका यांनी नांगर ढकलण्याच्या वादातुन बिभीषण
यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी, मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. बिभीषण यांच्या बचावास त्यांची पत्नीसह मुलगा-अविनाश हे सरसावले असता पाडळे कुटुंबीयांनी त्यांनाही मारहाण केली. यावरुन भादसं कलम 324, 504,506,34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.