समाजाला तारन्यासाठी मातृ सत्ताक कुटुबं पध्ततीची गरज आशिष पाटील

0

समाजाला तारन्यासाठी मातृ सत्ताक कुटुबं पध्ततीची गरज आशिष पाटील

लोहारा  /  प्रतीनीधी

लोहारा तालुक्यातील कास्ती येथे जिजाऊ ब्रिगेडच्या शाखेची स्थापना करण्यात आली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच नियोजन हे प्रतिभाताई परसे यांनी केले.तर अध्यक्ष स्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा शीवमती रंजनाताई हासूरे, प्रमूख पाहुणे संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी तालुकाध्यक्ष महेश गोरे, प्रमुख मार्गर्शक अशिषदादा पाटील होते .



आशिषदादा पाटील यांनी मार्गदर्शन करताना मराठा सेवा संघाचा विचार, जिजाऊ ब्रिगेडची भूमिका, महिला संघटनेची गरज आणि जिजाऊ माँसाहेब, येसूबाई राणीसाहेब, ताराराणी बाईसाहेब, अहिल्यामाई, रमाई यांच्या इतिहासातून आम्ही काय प्रेरणा घ्यावी, मातृसत्ताक कुटुंब पद्धती आम्ही स्वीकारली पाहिजे स्त्रिया या पुरुषांपेक्षा कुटुंब सरस पद्धतीने सांभाळू शकतात. याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले. 




या कार्यक्रमाच्या अध्यक्षा रंजना ताई हासुरे यांनी आपले विचार मांडताना म्हणाल्या की महिलांचे व्यवस्थापन कौशल्य पुरुषांपेक्षा सरस असते हे विशेषत्त्वाने पुरुषांनी मान्य केलेले आहे पण आपण आपल्या अस्तित्वाची जाणीव करून त्यांना करून दिली पाहिजे आपण स्वतःची प्रगल्भता वाढवली पाहिजे.                               




            
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या कास्ती अध्यक्ष पदी इन्दुमति पाटिल,सुमन कोळी सचिव,अनुसया परसे उपाध्यक्ष ,सुकुमार पाटिल कार्याध्यक्ष यांची निवड करण्यात आली. 




यावेळी गावातील कोरोणायोद्धा म्हणून स्वातीताई पाटील सामाजिक कार्यकर्त्या, तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या इंदुमती पाटील यांचा जिजाऊ ब्रिगेड कडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास तालुक्यातील प्रशांत थोरात, तसेच अनेक महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top