उस्मानाबाद / प्रतिनिधी-
तालुक्यातील आंबेवाडी, बेंबळी येथील ब्रिलीयंट टेक्निकल इंस्टिट्युट येथे स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांनी संस्थेच्या व्यवस्थापनाचे कौतुक करत भविष्यात संस्थेला मदत करणार असल्याचे सांगितले.
तालुक्यातील आंबेवाडी, बेंबळी येथील ब्रिलीयंट टेक्निकल इंस्टिट्युट येथे स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांनी संस्थेच्या व्यवस्थापनाचे कौतुक करत भविष्यात संस्थेला मदत करणार असल्याचे सांगितले.
ब्रिलीयंट टेक्निकल इंस्टिट्युट बेंबळी संचलित, ब्रिलियंट अपंग प्रशिक्षण केंद्र संस्थापक अध्यक्ष मा. श्री. इनामदार सर व सचिव मा. श्री. जुनेद शेरीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिलीयंट टेक्निकल इंस्टिट्युट बेंबळी संचलित, ब्रिलियांट अपंग प्रशिक्षण केंद्र बेंबळी (अंबेवाडी) येथे स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक शेडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. व प्रतिमा पुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष नवनाथ क्षिरसागर (माजी सरपंच-आंबेवाडी) व बाळासाहेब माने (माजी उपसरपंच-बेंबळी) यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी श्री. राजाराम केळगे(जि.प.सदस्य) श्री सोमनाथ गवळी , श्री संतोष आगलावे , श्री संतोष पाटील , श्री बापू दाणे, श्रीकृष्ण खापरे , श्री गालिब पठाण , श्री दरेकर (पोलीस पाटील-आंबेवाडी) पांडुरंग सुतार (सरपंच अंबेवाडी), मोहसीन शेख, नारायण इंगळे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे यांनी संस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी संस्थेमधील दिव्यांग व्यक्तींची घेण्यात येणाऱ्या काळजीचे कौतुक केले. केंद्राच्या परिसरातील टापटीपपणा, वृक्ष संगोपन, खेळांच्या सुविधा, स्वच्छता आधीची पाहणी शेंडगे यांनी केली.
यावेळी त्यांनी ही संस्था गावाचे भूषण असल्याचे म्हटले. ग्रामस्थांनीही या संस्थेच्या उत्कर्षासाठी व येथे शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी भरीव मदत करण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून संस्थेसाठी मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच या कार्यक्रमाच प्रास्ताविक श्री नानगर (मु.) यांनी केले सूत्रसंचालन श्री पाटील सर यांनी केले . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुळ सर यांनी केले. या वेळी कार्यशाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .