गावच्या विकासाचा बरोबरच युवकांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडावा - सपोनि नेटके :
भाट शिरपूरा येथे यशवंत, गुणवंतांचा सत्कार
उस्मानाबाद (प्रतिनिधी) शासकीय योजना गरजू पर्यंत पोहचवण्याबरोबरच उच्चशिक्षित तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडून भविष्य उज्वल करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांनी केले. भाटशिरपुरा (ता.कळंब जि.उस्मानाबाद.) येथे स्वतंत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नेटके बोलत होते.सरपंच सुनीता वाघमारे,रोटरीचे प्रांतपाल संजय देवडा, रोटरीचे कळंब अध्यक्ष धर्मेंद्र शहा यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी ग्रामपंचायत कार्यालय भाटशिरपुरा आणि ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपसरपंच सूर्यकांत खापे म्हणाले, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावच्या विकासाला चालना देण्याचे काम केले जात आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गावातील यशवंत आणि गुणवंताचा सत्कार करावा यासाठी ग्रामस्थ आग्रही होते आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
रोटरीचे प्रांतपाल संजय देवडा यावेळी बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी रोटरी आपल्या सोबत आहे.आपण निसंकोचपणे अडचणी सोडण्यासाठी रोटर इकडे या आम्ही तुमच्या सोबत आहोत. कोरोना संसर्गजन्य साथ रोगाच्या काळामध्ये जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका कांचन मधुकर कांबळे, आशा कार्यकर्ती राजकन्या शिरसट,पूनम वाघमारे,भाटशिरपुरा आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सहाय्यक श्रीमती वाघमारे यांच्यासह गुणवंत विद्यार्थी,आदर्श शिक्षक आणि गाव पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले. गावाने शासकीय योजना गरजूंपर्यंत पोचण्यासाठी राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. यापुढील काळात देखील ग्रामपंचायतीने गरजूंना सर्वतोपरी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. युवकांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग अवलंबून आपले भवितव्य उज्ज्वल करावे असे आवाहन केले.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गावातील युवकांना सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांनी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाचे वाटप केले.
कोरोना संसर्गजन्य साथ रोगांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवून भाटशिरपुरा येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश रितापुरे यांनी केले तर आभार श्रीकृष्ण वाघमारे यांनी मानले.