व्यायाम शाळा व क्रीडांगण विकासाच्या योजनेत प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
उस्मानाबाद,दि.17(जिमाका):- राज्य शासनाच्या क्रीडा व युवा धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी अंतर्गत व्यायाम शाळा विकास अनुदान योजना आणि क्रीडांगण विकास अनुदान योजनेअंतर्गत पात्र संस्थाकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. संबंधित संस्थानी आपले प्रस्ताव 27 ऑगस्ट 2021 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले आहे.
राज्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा तसेच सर्व नागरिकांचे आरोग्यमान चांगले राहावे, यासाठी शासनाच्या वतीने क्रीडा आणि युवा धोरणाची प्रभावी अंमलबाजवणी करण्यात येत आहे. क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने राज्यामध्ये विद्यार्थी आणि तरुणांसाठी व्यायामशाळा तसेच क्रीडांगणे विकसित करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यापैकीच व्यायामशाळा विकास अनुदान योजना आणि क्रीडांगण विकास अनुदान योजना आहेत. या योजना क्रीडा विभागाच्या वतीने राबविण्यात येतात.
व्यायामशाळा विकास अनुदान योजना व क्रीडांगण विकास अनुदान योजना या योजनांच्या माध्यमातून पात्र संस्थांना व्यायामशाळा साहित्यासाठी आणि क्रीडांगणाच्या ( क्रीडा साहित्य) विकासासाठी अनुदान मंजूर करण्यात येते.
व्यायामशाळा विकास योजना – यात जिल्हा वार्षिक योजनेतून व्यायामशाळा विकास(सर्वसाधारण आणि विशेष घटक योजनेकरिता) अंतर्गत किमान 500 चौ.फूट चटई क्षेत्राचे स्वतंत्र व्यायामगृह बांधणे, या शिवाय बांधकामामध्ये कार्यालय, भांडारगृह, प्रसाधनगृ
उस्मानाबाद जिल्हयातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत,नगरपरिषद, महा
क्रीडांगण विकास अनुदान योजना :- यात उदयोन्मुख खेळाडूंना क्रीडा कौशल्य आणि क्रीडा गुण विकसित करण्याची संधी उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य क्रीडांगणाच्या मुलभूत सुविधा तयार होणे आवश्यक असल्यामुळे क्रीडांगण विकास अनुदान योजना कार्यान्वित आहे. क्रीडांगण विकास योजनेंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200 मीटरचा धावनमार्ग तयार करणे, क्रीडांगणास भिंतीचे, तारेचे कुंपण घालणे, विविध खेळांची एक किंवा अधिक प्रमाणित क्रीडांगणे तयार करणे, प्रसाधनगृह, चेंजींग रूम बांधणे, पिण्याच्या आणि मैदानावर मारण्यासाठी आवश्यक पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य ठेवण्यासाठी भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर फ्लडलाईटची सुविधा निर्माण करणे, क्रीडा साहित्य खरेदी करणे, क्रीडांगणांवर मातीचा, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था तयार करणे, प्रेक्षक गॅलरीवर, आसन व्यवस्थेवर शेड तयार करणे, क्रीडांगणाभोवती ड्रेनेज व्यवस्था करणे या बाबींकरिता जास्तीत जास्त सात लाख रुपये आणि क्रीडा साहित्य खरेदी करिता जास्तीत जास्त तीन लाख रुपये अनुदान देण्यात येते.
उस्मानाबाद जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत, नगरपरिषद, महा
संबंधितानी सर्वसाधारण / विशेश घटक योजनेकरिता अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम,उस्मानाबाद यांच्याशी संपर्क साधून विहीत नमुन्यातील अर्ज परिपूर्ण माहितीसह दि. 27 ऑगस्ट, 2021 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत,असेही आवाहन श्रीमती भाग्यश्री बिले यांनी केले आहे.