उस्मानाबाद दि.१५ (प्रतिनिधी) - शहरातील नियोजित ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा, अशी मागणी क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी महासंघाच्यावतीने एका निवेदनाद्वारे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे दि.१५ ऑगस्ट रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उस्मानाबाद शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा या मागणीसाठी क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघासह इतर विविध संघटनांनी जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे वारंवार मागणी केली असून उपोषणे देखील केलेली आहेत. मात्र त्याची कोणीही दखल घेतली नसून त्यावर काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तर अण्णाभाऊ साठे यांचे २९२०-२१ हे जन्मशताब्दी वर्ष साजरे केले जात आहे.
उस्मानाबाद शहरात दि.२६ जानेवारी २०२१ हा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साठे यांच्या पुतळ्या विना साजरा करता आला. साठे यांना अभिवादन करण्यासाठी शहरातील साठे चौकातील नियोजित ठिकाणी त्यांचा पुतळा उभा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला गडाख यांनी आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अभिमान पेठे, जिल्हा सचिव बालाजी गोटमुकले व जिल्हा कोषाध्यक्ष मधुकर खिलारे उपस्थित होते.