परंडा येथील घरफोडीतील मालासह दोघे अटकेत ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा : रात्रीच्या वेळी घरफोडी करुन घरातील 1,06,200 ₹ रक्कम चोरुन नेल्याने परंडा पो.ठा. गु.र.क्र. 13 / 2020 हा भा.दं.सं. कलम- 457, 380 नुसार नोंदवण्यात आला आहे. तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- श्री. माने, पोहेकॉ- काझी, पोना- सय्यद, चव्हाण, पोकॉ- कोळी, आरसेवाड, मारलापल्ले यांच्या पथकाने गुन्ह्याच्या शैलीचा अभ्यास केला. यातून हा गुन्हा भुम येथील आरसोली रस्ता परिसरात राहणाऱ्या गणेश व सतिष मच्छिंद्र काळे या दोघा भावांनी केला असल्याचे निषपन्न झाले. यावर पथकाने आज दि. 20 सप्टेंबर रोजी त्या दोघांस ताब्यात घेतले असता नमूद गुन्ह्यातील चोरीच्या रकमेतून त्यांनी मोटारसायकल खरेदी केली असल्याचे समजले. यावर पथकाने ती मोटारसायकल जप्त करुन नमूद दोघांना परंडा पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.