तोतया पोलीसाकडून उस्मानाबाद शहरात १७ ग्रॅम वजनाच्या दोन सुवर्ण अंगठ्याची फसवणूक

0


तोतया पोलीसाकडून उस्मानाबाद शहरात १७ ग्रॅम वजनाच्या दोन सुवर्ण अंगठ्याची फसवणूक 

उस्मानाबाद (श.) पोलीस ठाणे : भरत उंबरे, वय 71 वर्षे, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद हे दि. 19 सप्टेंबर रोजी 10.30 वा. लेडीज क्लब समोरील रस्त्याने जात होते. यावेळी एका मोटारसायकल स्वाराने त्यांना अडवून आपन पोलीस असल्याची तोतयागिरी करुन त्यांना हातातील सुवर्ण अंगठ्या काढून ठेवण्यास सांगीतले. यावर भरत उंबरे यांनी हातातील 17 ग्रॅम वजनाच्या दोन सुवर्ण अंगठ्या काढल्या असता त्या तोतया पोलीसाने त्या अंगठ्या हातचलाखीने लांबवल्या. अशा मजकुराच्या भरत उंबरे यांनी दि. 19 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 170, 420 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top