उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी अपघात , एक ठिकाणी मारहाण गुन्हे दाखल
अपघात.”
येरमाळा पोलीस ठाणे : बाबासाहेब अण्णा ओव्हळ, वय 55 वर्षे, रा. उपळाई हे दि. 21.06.2021 रोजी 20.00 वा. सु. उपळाई ते कळंब असा प्रवास मोटारसायकलने करत होते. दरम्यान उपळाई फाटा येथे त्यांनी मोटारसायकल निष्काळजीपने, भरधाव वेगात चालवल्याने ती घसरल्याने या अपघातात बाबासाहेब हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- तेजस ओव्हळ यांनी अनैसर्गीक मृत्यु क्र. 26 / 21 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशीत दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : निलावती मारुती भोसले, रा. येडशी, ता. उस्मानाबाद या दि. 11 सप्टेंबर रोजी 09.30 वा. सु. येडशी येथील लातूर रस्त्याने पायी जात होत्या. यावेळी अज्ञात चालकाने कार क्र. एम.एच. 12 क्युजि 6466 ही निष्काळजीपने चालवून निलावती भोसले यांना पाठीमागून धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या निलावती यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : शरणबसप्पा कल्याणी तळवार, रा. खजुरी, ता. आळंद हे दि. 18 सप्टेंबर रोजी 22.00 वा. सु. कसगीवाडी पाटी येथील रस्त्याने पायी जात होते. दरम्यान रफिक लाडलेसाब मुल्ला, रा. दाळिंब, ता. उमरगा यांनी मोटारसायकल क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 6495 ही निष्काळजीपने चालवून शरणबसप्पा यांना समोरुन धडक दिल्याने यात शरणबसप्पा यांच्या डाव्या पायाचे हाड मोडले आहे. अशा मजकुराच्या शरणबसप्पा तळवार यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
आनंदनगर पोलीस ठाणे : रोहित जाधव, देवा कोळी, दाघे रा. शिंगोली, ता. उस्मानाबाद यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 18 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. शिंगोली येथील एका पानस्टॉलसमोर उस्मानाबाद येथील संकेत सतीश बागल यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या संकेत बागल यांनी दि. 19 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.