सारिका ताई भिलारे"यांचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सन्मान

0

"सारिका ताई भिलारे"यांचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सन्मान.

(परंडा -विजय शेवाळे)

परंडा तालुक्यातील भिल्लारेनगर (पांढरे वाडी पश्चिम) येथील अंगणवाडीने  ‘सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमामध्ये परंडा तालुक्यातून अव्वल स्थान पटकाविले आहे. 17 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन जि.प अध्यक्षा अस्मिता कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता यांच्या हस्ते अंगणवाडी सेविका सारिकाताई भिल्लारे यांचा गाैरव करण्यात आला.

औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून 2020-2021 मध्ये सुंदर माझे कार्यालय हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात विभाग ते गावस्तरावरील प्रत्येक कार्यालयाला सहभागी होण्याबाबत आदेशित केलेले होते. यामध्ये प्रत्येक कामाला गुण ठरवून दिलेले होते. यात ज्या कार्यालयाचे गुण जास्त होतील ते पुरस्कारासाठी पात्र ठरणार होते. त्यानुसार सर्व कार्यालयांचे सर्वेक्षण करण्यात आले असता, परंडा  तालुक्यातून भिल्लारेनगर  येथील अंगणवाडी अव्वल ठरली  आहे.

 या कार्यात प्रकल्प अधिकारी अमोल चव्हाण , पर्यवेक्षीका सी.एम.लोंंडे यांचे मार्गदर्शन व मदतनीस एस.पी.जेकटे यांचे सहकार्य लाभले.सदर पुरस्कार मिळाल्याने तालुकास्तरातून कौतुक होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top