गालिबनगर येथे अतिवृष्टी झाल्याने व पाणी घरात शिरल्याने कांही लोक घरात अडकले असल्याची माहिती साळूंके यांना मिळताच त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जावून प्रशासकीय यंत्रणेला जागे करत जिल्हाधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर मदतीचा ओघ सुरु झाला व तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक व अग्निशामक दल यांच्या मदतीने घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले
तेरणा नगर पासून येणारे पाणी व त्याचा नैसर्गिक प्रवाह यावर काही लोकांनी घरे दुकाने थाटून अतिक्रमणे केली आहेत याकडे नगरपालिका गेली ३० वर्षापासून दुर्लक्ष करत आहे विशेष म्हणने गालिब नगर परिसरात खासदार व आमदार निधीतून रस्ता करण्यासाठी वक्फ बोर्ड आणि नगर परिषदेकडून ना हरकत प्रमाणपत्र कसे काय दिले जाते ? हा प्रश्न आहे.
गालिब नगर भागात प्रत्येक पावसाळ्यामध्ये अशीच परिस्थिती निर्माण होत असताना देखील लोकप्रतिनिधी यांच्याकडून कायमस्वरूपी उपाययोजना करतील ही आशा येथील नागरिकांना होती परंतु पाऊस पडला आणि लोकांच्या घरात पाणी शिरले की फक्त फोटो पुरतेच लोकप्रतिनिधी उरले काय ? असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला आहे
कायमस्वरूपी मार्ग काढणार - प्रशांत साळुंके
गालिब नगर भागातील नागरिकांचा हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रशांत साळुंके यांनी मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता साळुंके यांनी सांगितली आहे.