उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी , विनयभंग , अपघात , मारहाण गुन्हे दाखल
तामलवाडी पोलीस ठाणे : किशोर वसंत जाधव, रा. देवकुरळी, ता. तुळजापूर यांनी त्यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एसी 4068 ही दि. 17 सप्टेंबर रोजी 17.30 ते 18.30 वा. दरम्यान त्यांच्या शेताजवळील देवकुरळी ते कुंभारी रस्त्याकडेला लावली असता ती अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या किशोर जाधव यांनी दि. 18 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
दुसऱ्या घटनेत धोत्री गावातील सुग्रीव दिगंबर गोडसे व त्यांच्या शेजारील एका घराचे कुलूप अज्ञाताने दि. 17- 18 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री तोडून गोडसे यांच्या घरातील 4,000 ₹ रोख रक्कम आणि त्यांच्या शेजाऱ्याच्या घरातील 4 साड्या व 13,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुग्रीव गोडसे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : कन्हैयालाल भगवान जंत्रे, रा. पळसप, ता. उस्मानाबाद यांच्या गावशिवारातील खडी क्रशर केंद्रासमोर लावलेले टिप्पर क्र. एम.एच. 23 डब्ल्यु 0319 हा दि. 18 सप्टेंबर रोजी पहाटे 03.40 वा. सु. अज्ञाताने चोरुन नेले आहे. अशा मजकुराच्या कन्हैयालाल जंत्रे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“विनयभंग.”
कळंब पोलीस ठाणे : एका गावातील एक 15 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) 17 सप्टेंबर रोजी 14.00 वा. सु. तीच्या राहत्या घरी असतांना गावातीलच एका तरुणाने तीच्या घरासमोर येउन आरडा-ओरड करुन जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तीच्या घरात घुसून त्या मुलीसोबत सलगी करण्याचा प्रयत्न करुन तीचा विनयभंग केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या पालकांनी दि. 18 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 354 सह पोक्सो कायदा कलम- 8, 12 सह ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“अपघात.”
तामलवाडी पोलीस ठाणे : चालक- विठ्ठल हुकीरे, रा. उपळा, ता. उस्मानाबाद यांनी दि. 03 सप्टेंबर रोजी सुरतगाव शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर कार क्र. एम.एच. 13 एझेड 7033 ही निष्काळजीपने चालवून रस्त्याकडेने पायी जाणाऱ्या 40 वर्षीय एका अनोळखी पुरुषास पाठीमागुन धडक दिल्याने तो गंभीर जखमी होउन मयत झाला. अशा मजकुराच्या तामलवाडी पो.ठा. येथील पोहेकॉ- गोरोबा गाढवे यांनी अनैसर्गीक मृत्युच्या चौकशीत दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे : अज्ञात चालकाने दि. 18 सप्टेंबर रोजी स्कार्पिओ वाहन क्र. जी.जे. 18 बीए 1580 हे इंदापुर ते वाशी रस्त्यावर निष्काळजीपने, भरधावर वेगात चालवून समोरुन येणाऱ्या स्विफ्ट कार क्र. एम.एच. 13 डीएम 4869 ला धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारमधील चालक- आकाश सुरेश जगताप यांसह त्यांची बहिन- अभिलाषा डमरे, भाऊजी- दिनेश डमरे व भाचा- ओम हे सर्वजण किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या आकाश जगताप यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
उमरगा पोलीस ठाणे : वागदरी, ता. उमरगा येथील मारुती व बिभीषण रावसाहेब भासले या दोघा भावांत कौटुंबीक कारणावरुन दि. 17 सप्टेंबर रोजी 22.30 वा. सु. राहत्या घरी वाद झाला. यात बिभीषण भोसले यांनी मारुती यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन दाढींच्या ब्लेडने हातावर, नाकावर वारकरुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मारुती भोसले यांनी दि. 18 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.