सांगवी काटी येथे बक्षीस वितरण सोहळा संपन्न : कोरोना योद्ध्यांचाही सत्कार.
प्रतिनिधि (सांगवी का),
तुळजापूर :- सालाबाद प्रमाणे यावर्षी ही सांगवी काटी येथील छत्रपती शिवाजी मित्र मंडळ यांच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा तामलवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सचिन पंडित व पोलीस निरीक्षक श्री घुले सर यांच्या हस्ते वितरण करण्यात आला. यावर्षी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या वर्षी सिंहगड योद्धा या संघाने विजेतेपद पटकावले. या संघाचे कर्णधार दिनेश शिवाजी माळी यांचा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन तामलवाडी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पंडित सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळ सांगवी काटी हे मंडळ गेल्या वीस वर्षापासून गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवून गणेशोत्सव साजरा करत आहे उत्सवादरम्यान अनेक सामाजिक उपक्रम या मंडळाकडून राबवले जातात. रक्तदान शिबीर, नाटकाच्या एकांकिकेतून समाज प्रबोधन, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्यास्पर्धा, गेल्या दोन वर्षापासून उद्भवलेल्या कोरोणा महामारी मध्ये सर्व गावामधे स्यानीट्रायझर मास्क वाटप करणे.
लॉकडाउन काळामध्ये पोलीस यंत्रणेवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर ताण निर्माण झाला होता. गेल्या काळात पोलिस व आरोग्य कर्मचारी देवदूत बनुन आपल्या साठी उभे होते. पोलिसांचेही आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून तामलवाडी पोलिस स्टेशनला पण या मंडळाने स्यानीट्रायझर वाटप केले होते.
गेल्या दीड वर्षापासून उद्भवलेल्या कोरूना या विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला असून ह्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करताअंगणवाडी सेविका आशा ताई पोलिस पाटील, ग्रामपंचायत शिपाई यांनी गाव कोरोणा मुक्त ठेवण्यासाठी खुप अथक परिश्रम घेतले त्यामुळें या कोरोना योद्ध्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी गणेश मंडळाचे अध्यक्ष उमेश रघुनाथ रोकडे, उपाध्यक्ष विष्णू बाळासाहेब मगर, मंडळाचे आधारस्तंभ व गावचे प्रतिष्ठित व्यक्ती महेश अच्युतराव पाटील, लोकमतचे पत्रकार संतोष मगर, मंडळाचे कार्यवाहक रामदास शामराव मगर, बिबीशन गायकवाड, विनायक शेळके, विशाल मगर, नागनाथ मगर ,श्रीकांत कुलकर्णी, शशिकांत परीट, धनाजी परीट, (शिक्षक) अण्णासाहेब मगर, पिंटू पाटील, व गावातील सर्व गणेश भक्त उपस्थित होते.