‘एडीएम’तर्फे शाश्वत शेती उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शन शिबीर
पाणी फाउंडेशनचे सीइओ सत्यजित भटकळ, वनामकृवि परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण राहणार उपस्थित
उस्मानाबाद : एडीएम ॲग्रो इंडस्ट्रीज, लातूर (पूर्वीचे नाव - टिना ऑईल) यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या शाश्वत शेती उपक्रमाअंतर्गत *'शाश्वत शेतीमध्ये जैव विविधता आणि जल व मृदा संधारणाचे महत्त्व'* या विषयावर २० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक १० वाजता जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.
हा कार्यक्रम कळंब तालुक्यातील डेक्कन फार्मस् प्रांगण, चोराखळी (वाणेवाडी) येथे होणार असून मार्गदर्शन करण्यासाठी पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे राहणार असून एडीएम ॲग्रो इंडस्ट्रीज चे मुख्य सल्लागार टी. पी. शेनॉय व एडीएम ॲग्रो इंडस्ट्रीज चे संचालक तथा वाणिज्य विभाग प्रमुख अपुर्व गर्ग यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
उस्मानाबादसह लातुर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या कार्यक्रमात सहभागी होता यावे यासाठी मायक्रोसॉफ्ट टीमस् व गुगल मीटद्वारे ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाचे प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी एडीएम शाश्वत शेती कार्यक्रम समन्वयक दयानंद माने (९६७३३३६५०५) यांच्याशी संपर्क साधावा.