खेळाडूच्या प्रवेश निश्चिती चाचणीसाठी राज्यस्तरावर पदक प्राप्त खेळाडूना आवाहन
उस्मानाबाद,दि.20(जिमाका):-आं
दि. 22 सप्टेंबर-2021 पासून चाचणी सुरूवात होणार असून सायंकाळी ५.०० वाजता खेळाडुंची उपस्थिती आवश्यक आहे. चाचणीसाठी पुणे येथील अथलेटीक्स मुख्य स्टेडीयम शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळूंगे बालेवाडी येथे चाचणी होणार आहे. चाचणीस येताना खेळाडूंना लागणारे आवश्यक क्रीडा साहित्य त्यांनी स्वत: घेवून यावे.
राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्राची छायांकित प्रत आणि मूळ प्रत सोबत आणावी. शिवछत्रपती क्रीडा संकूल महाळूगे बालेवाडी येथे निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे संपर्क क्रमांक -९९२३५३१४२३ येथे करावा. या चाचणीसाठी शिफारस पत्र कार्यालयातून घेवून जावे.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले आहे.