उस्मानाबाद शहरातील या भागामध्ये रस्ते , नाल्या नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांशी सामना! , प्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा!
उस्मानाबाद: उस्मानाबाद शहरातील नगरपालिका हद्दीतील खॉजानगर प्रभाग क्र .१६ उमर मोहल्ला , नवीन भारत विदयालय रोड , कोकाटे कॉम्पलेक्स च्या पाठीमागे , कचरा डेपो कडे जाणारा रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. नाल्या , रस्ते नसल्याने या भागात घाणीचे सामाज्य झाले आहे . या भागात सपुर्ण पावसाचे पाणी रस्त्यावर जमा होत आहे. त्या पाण्यामुळे सध्या डेगु , मलिरया सारख्या रोगाचे प्रमाण खुप भयानक वाढले आहे .नविन भारत विदयालय शाळा येथील विदयार्थी शाळेत जाण्या-येण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे . व सलग पाऊस झाला तर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले जाते व नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांचा विचार करून या भागात विकास कामे करावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे
त्यामुळे या भागातील लवकरात लवकर करून रस्ते , नाल्या , व पथदिवे बसविण्यात यावेत यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने उस्मानाबाद नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात प्रहार संघटनेचे उस्मानाबाद शहर अध्यक्ष जमीर शेख यांनी प्रशासनाने तात्काळ हे प्रश्न मार्गी न लागल्यास नगरपरीषद प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.