उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान ३२ छापे

0



उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई दरम्यान ३२ छापे

उस्मानाबाद जिल्हा : उस्मानाबाद पोलीस दलाने काल दि. 09 सप्टेंबर रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी मोहिम राबवून खालील प्रमाणे कारवाया केल्या. यात 850 लि. गावठी मद्य निर्मीतीचा द्रवपदार्थ, 235 लि. अवैध गावठी मद्य तर 2,886 देशी- विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत 32 गुन्हे संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल केले आहेत.

1) शिराढोन पो.ठा. च्या पथकास शहनवाज कुरेशी व शहाबाज कुरेशी हे दोघे रांजणी येथील त्यांच्या पत्रा शेडसमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी- विदेशी दारुचे एकुण 55 खोकी त्यात एकुण 2,640 बाटल्या दारु बाळगलेले आढळले.

2) अंबी पो.ठा. च्या पथकास किरण सावंत हे रत्नापूर शिवारातील एका हॉटेलजवळ देशी दारुच्या 14 बाटल्या बाळगलेले आढळले.

3) कळंब पो.ठा. च्या पथकास परळी बायपास रोड, कळंब येथे सायबाबाई काळे या 19 लि. गावठी दारु बाळगलेल्या, ईटकुर शिवारात बालीबाई शिंदे या 20 लि. गावठी दारु बाळगलेल्या तर पारधी पिढी, मोहा येथे किसन शिंदे हे दोन कॅनमध्ये एकुण 20 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

4) भुम पो.ठा. च्या पथकास पाथरुड येथील एका हॉटेलसमोर रोहन पौळ हे 180 मी.ली. देशी दारुच्या 16 बाटल्या, सुकटा येथील महारुद्र पांढरे हे त्यांच्या घरासमोर देशी दारुच्या 10 बाटल्या तर वालवड शेत शिवारात योगेश मोहिते हे 180 मी.ली. देशी दारुच्या 12 बाटल्या बाळगलेले आढळले.

5) स्था.गु.शा. च्या पथकास खामकरवाडी येथील ताई काळे या तेरखेडा येथील एका हॉटेसमोर देशी- विदेशी दारुच्या 76 बाटल्या अवैध  विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या आढळल्या.

6) येरमाळा पो.ठा. च्या पथकास शेलगाव येथील सिध्देश्वर खुने हे आपल्या घरासमोर देशी दारुच्या 10 बाटल्या बाळगलेले, येरमाळा येथील शरीफ शेख हे येरमाळा येथील बार्शी रस्त्याकडेला देशी दारुच्या 10 बाटल्या बाळगलेले तर वडजी येथील रमजान शेख हे आपल्या घराजवळ देशी दारुच्या 38 बाटल्या बाळगलेले आढळले.

7) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास धनगरवाडी येथील विकास येडके हे 2,160 ₹ किंमतीचे देशी- विदेशी मद्याच्या बाटल्या बाळगलेले आढळले.

8) लोहारा पो.ठा. च्या पथकास उंडरगाव येथे राजेंद्र गायकवाड हे देशी दारुच्या 10 बाटल्या बाळगलेले आढळले.

9) उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास इंदिरानगर, उस्मानाबाद येथे मंजुळाबाई काळे या 30 लि. गावठी दारु बाळगलेल्या तर पारधी पिढी, उस्मानाबाद येथे कमलाबाई काळे या 14 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

10) उस्मानाबाद (ग्रा.) येडशी येथील नवनाथ पवार हे येडशी उड्डान पुलाजवळ 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

11) वाशी पो.ठा. च्या पथकास गिरवली शिवारात कालिंदा काळे या 10 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

12) मुरुम पो.ठा. च्या पथकास मुरुम येथील राम कांबळे हे त्यांच्या घरासमोरील टपरीमध्ये 10 लि. गावठी दारु बाळगलेले, आष्टाकासार येथील वैजीनाथ शिदोरे हे गावशिवारात 9 लि. गावठी दारु बाळगलेले तर येणेगूर येथे अनील गाडेकर हे 10 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

13) परंडा पो.ठा. च्या पथकास जवळा येथील राहुल चौधरी हे त्यांच्या घराजवळील झाडाखाली देशी दारुच्या 13 बाटल्या बाळगलेले आढळले.

14) आनंदनगर पो.ठा. च्या पथकास झोपडपट्टी सांजा येथील सविता पवार या राहत्या परिसरात 18 लि. गावठी दारु बाळगलेल्या तर शिंगोली तांडा येथील खेमाबाई आडे या आपल्या घरासमोर 12 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

15) तामलवाडी पो.ठा. च्या पथकास माळुंब्रा येथील दोन हॉटेल बाजूस सचिन जाधव व संजय वाघमारे हे दोघे एकुण देशी दारुच्या 29 बाटल्या बाळगलेले आढळले.

16) तुळजापूर पो.ठा. च्या पथकास गोरख पारधे हे त्यांच्या घराजवळ 4 लि. गावठी दारु बाळगलेले आढळले.

17) उमरगा पो.ठा. च्या पथकास औराद येथील अनिल कांबळे हे त्यांच्या घरासमोर 9 लि. गावठी दारु बाळगलेले तर तुरोरी येथील रत्नाबाई धोत्रे या त्यांच्या घराजवळ एका प्लास्टीक घागरीत 20 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

18) ढोकी पो.ठा. च्या पथकास दुधगाव येथील सुरेखा पवार व आशा पवार या दोघी पारधी पिढी, दुधगाव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकुण गावठी दारु निर्मीतीचा 850 लि. द्रवपदार्थ व 20 लि. गावठी दारु बाळगलेल्या आढळल्या.

19) बेंबळी पो.ठा. च्या पथकास समुद्रवाणी तांडा येथील प्रभु राठोड हे समुद्रवाणी शिवारातील एका ढाब्यासमोर देशी दारुच्या 8 बाटल्या बाळगलेले आढळले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top