सारोळा येथे ई-पीक पाहणीसाठी मार्गदर्शन

0

सारोळा येथे ई-पीक पाहणीसाठी मार्गदर्शन


उस्मानाबाद: तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथे ई-पीक पाहणी कशी करावी, यासंदर्भात तलाठी व कृषी सहाय्यक यांनी शुक्रवारी (दि.१०) शेतकऱ्यांना माहिती देवून प्रत्यक्षिक दाखविले. तसेच जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपवर माहिती भरण्याचे आवाहन केले.

शासनाने यावर्षी ई-पीक पाहणी ॲप सुरु केले आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबवण्यात येत आहे. माझी शेती, माझा सातबारा, माझा पिकपेरा या घोषवाक्याच्या आधारे शासनाने हा प्रकल्प सुरू केला आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी करावी. ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतील, त्यांनी तलाठी व कृषी सहाय्यकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. 



तलाठी व्ही. व्ही. वायचळ व कृषी सहाय्यक लोणेकर यांनी शेतकऱ्यांना या ॲपविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच नोंदणी कशी करावी, यासंदर्भात मोबाईलवर प्रात्यक्षिक दाखविले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲपवर माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शेतकरी गौतम बाकले, रमेश रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले, ॲड. शामसुंदर सारोळकर, हभप बबन मिटकरी, जीवन देवगिरे,  सुरेश कोल्हे, अनिल चंदणे आदींसह शेतकरी उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top