मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे जिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न.
विडिओ बातमी 👇👇👇
उस्मानाबाद :- सध्या चालु असलेल्या कोवीड - 19 च्या महामारीच्या काळात दवाखान्यांमध्ये रक्ताची तीव्र कमतरता असल्याने समितीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी उस्मानाबाद येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात 27 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उदघाटन नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष राजेनिंबाळकर म्हणाले की, आजच्या युगातील रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने रक्तदान करणे हा एकमेव पर्याय समाजापुढे आहे आणि हिच सामाजीक बांधीलकी लक्षात घेऊन समितीने राबविलेला उपक्रम अनुकरणीय आहे.
समितीचे अध्यक्ष आशिष मोदानी यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष नितीन भोसले, रक्त संक्रमण अधिकारी डॉ . अश्विनी गोरे मॅडम, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, उमेश राजेनिंबाळकर, नगरसेवक दर्शन कोळगे, युवराज राजेनिंबाळकर, मनिषा राखुंडे पाटील मॅडम, ॲड योगेश सोन्ने पाटील, रोहित पडवळ, जावेद काझी, अनंत जगताप, जयंत देशमुख, गजानन खर्चे पाटील, विशाल पाटील, प्रसाद मुंडे, संतोष मुळे, विशाल थोरात, रुद्र भूतेकर व समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते .