उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी चोरी , दोन ठिकाणी अपघात गुन्हे दाखल
बेंबळी पोलीस ठाणे : संपत नारायण काकडे, रा. चिखली, ता. उस्मानाबाद हे दि. 08 सप्टेंबर रोजी 12.30 ते 15.30 वा. दरम्यान चिखली शेत शिवारातील एका झाडाखाली झोपले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या सदऱ्याच्या खिशातील स्मार्टफोन अज्ञाताने चोरुन नेला. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे : गणेश पुरी, रा. दुधगाव, ता. उस्मानाबाद हे दि. 10 सप्टेंबर रोजी 09.00 वा. सु. गावातील आपल्या किराणा दुकानात होते. यावेळी एका मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी परुषांनी दुकानात खरेदी करण्याचा बहाना करुन गणेश यांची नजर चुकावून दुकानाच्या गल्ल्यातील स्मार्टफोन व 3,600 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“अपघात.”
शिराढोन पोलीस ठाणे : मंगरुळ येथील सुनिल नानासाहेब रितापुरे व जगन्नाथ भराडे हे दोघे दि. 27.08.2021 रोजी 10.20 वा. सु. खामसावाडी शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13- 1541 ने प्रवास करत होते. दरम्यान अज्ञात चालकाने ट्रॅक्टर क्र. एम.एच. 24 एजि 2097 हा निष्काळजीपने चालवून सुनिल चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने या अपघातात नमूद दोघांच्या पायाचे हाड मोडले आहे. या अपघातानंतर नमूद ट्रॅक्टरचा अज्ञात चालक अपघाता स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या सुनिल रितापुरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे : चालक- राहुल दत्तु वाघ, रा. नाशिक यांनी दि. 10 सप्टेंबर रोजी 10.00 वा. सु. सांगवी येथील मॉडर्न हायस्कुल समोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर पिकअप वाहन क्र. एम.एच. 15 जिव्ही 8324 हा निष्काळजीपने चालवून बालाजी म्हमाने, रा. कसई, ता. तुळजापूर हे चालवत असलेल्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात बालाजी यांसह पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नी- मनिषा या जखमी झाल्या. अशा मजकुराच्या बालाजी म्हमाने यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.