फक्राबाद येथून सकाळ पासून एक महिला बेपत्ता, ग्रामस्थांकडून शोध मोहीम सुरू

0


फक्राबाद येथून सकाळ पासून एक महिला बेपत्ता,  ग्रामस्थांकडून शोध मोहीम सुरू


उस्मानाबाद जिल्हातील वाशी तालुक्यातील फक्राबाद येथून एक वृद्ध महिला दि.26-9-2021 रोजी पहाटे पासून बेपत्ता झाली आहे. माहिलेच्या घरच्यांनी सगळीकडे शोधा शोध करून ही महिला सापडली नाही. या बाबत अधिक माहिती अशी की पदमीनबाई न्यानोबा राख रा. फक्राबाद ता. वाशी (वय )70वर्ष ही महिला आज पहाटेपासून बेपत्ता आहे. घरच्यांच्या व गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती मांजरा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. वाशी पोलीस प्रशासन, वाशी तहसीलदार,तलाठी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उस्मानाबाद व गावकऱ्यांच्या मदतीने संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शोध कार्य सुरू होते. अद्याप शोध लागलेला नाही. तरी ती महिला कोणाला दिसल्यास वाशी पोलिस ठाणे या नंबर वर संपर्क करावा असे आव्हान केले आहे. 02478-276033

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top