जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कायमस्वरूपी आळा बसण्यासाठी प्रयत्न करणार - पोलीस अधीक्षक नीवा जैन - Efforts will be made to curb illegal trade in the district permanently - Superintendent of Police Niva Jain

0


जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कायमस्वरूपी आळा बसण्यासाठी प्रयत्न करणार - पोलीस अधीक्षक नीवा जैन 



उस्मानाबाद :- जिल्ह्यात अवैध धंद्याची माहिती घेऊन त्यावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नूतन पोलीस अधीक्षक निवा जैन यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आज दिनांक २७ सप्टेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले यावेळी अपर पोलीस अधीक्षक नवनीत कुमार कांवत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन घाडगे उपस्थित होते 




  पुढे बोलताना जैन म्हणाल्या की आई श्री तुळजाभवानी मातेच्या पवित्र पावन भूमीत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते पोलीस अधीक्षक पदी माझी नेमणूक होऊन केवळ आठच दिवस झाले आहेत व संपूर्ण महाराष्ट्रात सह आपल्या जिल्ह्यात सुद्धा नवरात्र महोत्सव सुरू होत असून तब्बल दोन वर्षानंतर मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्रप्रदेश येथून येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता त्या दृष्टीने नियोजन करणे आमच्यासाठी आव्हानात्मक असेल सुरक्षितेच्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे सज्ज असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे आमचे बारकाईने लक्ष असणार आहे




    जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी संदर्भात काही माहिती असल्यास त्यांनी कोणताही संकोच न बाळगता संपर्क करण्याचे अवाहन अपर पोलीस अधीक्षक नवनीत कुमार यांनी यावेळी केले जो कोणी माहिती देईल त्याचे नाव गुप्त राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले .


    श्री क्षेत्र तुळजापूर या ठिकाणी नवरात्र महोत्सव साजरा करत असताना अवैध धंदे तसेच मोबाईल चोर यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top