दारु भट्टीवर छापा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
स्थानिक गुन्हे शाखा : तावरजखेडा तांडा येथे दारु भट्टी चालू असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या पथकास मिळाल्याने स्था.गु.शा. चे पथक, उस्मानाबाद पो.मु. येथील दंगल नियंत्रण पथक व ढोकी पो.ठा. चे सपोनि- श्री. बनसोडे यांचे संयुक्त पथक हे आज दि. 27 सप्टेंबर रोजी पहाटे नमूद ठिकाणी रवाना झाले.
पोलीस पथकाने 07.30 वा. सु. तावरजखेडा तांडा येथे दारु भट्टीवर छापा मारला असता 1)अशोक तुकाराम चव्हाण 2)यशवंत लालसिंग राठोड 3)नंदकुमार केशव राठोड 4)शंकर बालाजी चव्हाण 5)पंडीत गंगाराम जाधव 6)नागनाथ किसन राठोड 7)संजय विनायक पवार, सर्व रा. तावरजखेडा तांडा हे सर्वजण अप्रत्यक्षरित्या 200 लि. क्षमतेच्या 32 लोखंडी पिंपांत एकुण 6,400 लि. गावठी दारु निर्मीतीचा द्रवपदार्थ बाळगले असतांना पथकास आढळले.
यावर पोलीसांनी दारु निर्मीतीचा द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला असून नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 65 (फ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.