उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी चोरी , एक ठिकाणी विनयभंग , मारहाण , दोन ठिकाणी अपघात

0

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी चोरी , एक ठिकाणी विनयभंग , मारहाण , दोन ठिकाणी अपघात

चोरी.

नळदुर्ग पोलीस ठाणे : नागनाथ व्यंकटराव कदम, रा. जळकोट, ता. तुळजापूर यांच्या जळकोट गट क्र. 763 मधील शेतातील शेडचा कडी- कोयंडा अज्ञाताने दि. 25- 26 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री तोडून आतील 30 क्विंटल सोयाबीन चोरुन नेली. अशा मजकुराच्या नागनाथ कदम यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

परंडा पोलीस ठाणे : “कमी किंमतीत सोने देतो.” असे आमिष बाबुशा सुपनाश पवार, रॉनी बाबुशा पवार, विशाल बाबुशा पवार, आशा पवार, सर्व रा. जवळा (नि.), ता. परंडा यांनी रंगकाम करणारे रोहीत वीरेंद्रर सिंह, राजेश पवन सिंह, दोघे रा. मुंबई यांना दाखवून त्यांच्याकडून 30,000 ₹ रक्कम घेउन मोबदल्यात 3 ग्रॅम सुवर्ण दागिने दिली. यानंतर ठरल्याप्रमाणे नमूद पवार कुटूंबीयांनी त्या दोघांना दि. 26 सप्टेंबर रोजी 09.00 वा. सु. जवळा (नि.) येथील आपल्या घरी बोलावून त्या चौघांनी रोहीत व राजेश यांना चाकूचा धाक दाखवून त्या दोघांजवळील 1,11,500 ₹ रोख रक्कम, युपीआय प्रणालीद्वारे 50,000 ₹ रक्कम, 3 भ्रमणध्वनी, हातातील दोन सुवर्ण अंगठ्या व एक चांदीचे कडे असे सर्व बळजबरीने काढून घेतले. अशा मजकुराच्या रोहीत सिंह यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 420, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

विनयभंग.

उस्मानाबाद जिल्हा : एक 35 वर्षीय विवाहीत महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 24 सप्टेंबर रोजी 11.30 वा. सु. आपल्या घरात एकटी असतांना गावातीलच एका पुरुषाने तीच्या घरात घुसून तीला लैंगीक अनुग्रह केला. यावर त्या महिलेने आरडा-ओरड करताच त्याने तीला शिवीगाळ करुन घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीला ठार मारण्याची धमकी‍ दिली. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दि. 26 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 354, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 

मारहान.

आनंदनगर पोलीस ठाणे : साईबान्ना चंदन्ना क्षिरसागर, रा. उस्मानाबाद व त्यांची मुलगी- अनुष्का असे दोघे दि. 26 सप्टेंबर रोजी 15.30 वा. सु. उस्मानाबाद येथील फुडमॉल हॉटेल येथे गेले होते. दरम्यान उस्मानाबाद येथील रहिवासी- स्वप्नील शिंदे, अनिल शिंदे, संदिप, महेश, ज्ञानेश्वर, सौरभ अशा सहाजणांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणारुन साईबान्ना यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, हातातील कड्याने मारहान करुन जखमी केले. यावेळी अनुष्का ही वडीलांस होत असलेल्या मारहानीचे भ्रमणध्वनीद्वारे छायाचित्रण करत असतांना नमूद लोकांनी तीझ्या हातातील भ्रमणध्वनी घेउन फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या साईबान्ना क्षिरसागर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 143, 147, 149, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  

अपघात.

तामलवाडी पोलीस ठाणे : एसटी बस चालक- गंगाधर येवतीकर, रा. मुखेड, जि. नांदेड हे दि. 26 सप्टेंबर रोजी 16.45 वा. सु. तामलवाडी टोलनाका येथून बस क्र. एम.एच. 20 बीएल 1652 ही चालवत जात होते. यावेळी टोलनाक्यावर फास्टॅग लेनवर बस थांबली असता समोरील ट्रक क्र. एम.एच. 18 एपी 2969 चा चालक- दुर्गेश कहार, रा. मध्यप्रदेश यांनी ट्रक ‍निष्काळजीपने पाठीमागे चालवून नमूद बसला समोरुन धडक दिली. या अपघातात बसची समोरील काच फुटून आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या बस चालक- गंगाधर येवतीकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 427 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

नळदुर्ग पोलीस ठाणे : संदीप दत्तात्रय खराडे, रा. मसला (खु.), ता. तुळजापूर हे दि. 25 सप्टेंबर रोजी 20.00 वा. सु. बसवंतवाडी फाटा येथील तुळजापूर ते नळदुर्ग रस्त्याने म्हैशी घेउत जात होते. दरम्यान रुग्णवाहिका क्र. एम.एच. 25 एजे 3457 ही अज्ञात व्यक्तीने निष्काळजीपने चालवून त्या म्हैशींना धडक दिल्याने या अपघातात दोन म्हैशी किरकोळ व एक म्हैस गंभीर जखमी झाली. तसेच स्वत:च्या रुग्णवाहिकीचे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या संदीप खराडे यांनी दि. 26 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 428 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top